मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियरचा मृत्यू

मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉक शहरात स्थायिक आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2017, 04:44 PM IST
मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियरचा मृत्यू title=

ठाणे : मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉक शहरात स्थायिक आहेत. पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी ते  आठवड्यापूर्वीच ठाण्याच्या पोखरण रोड येथील रौनक पार्क येथे आले होते.

शनिवारी संध्याकाळी पुन्हा बँकॉकला ते रवाना होणार होते. मात्र शनिवारी सकाळीच मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सराफ यांचा बेथनी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. इमारतीच्या खाली मित्राला भेटण्यासाठी सराफ आले असता मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

नागरिकांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून, चादर टाकून मधमाशांपासून सुटका केली. या धावपळीत सराफ हे बेशुद्ध पडले. उपाचा-या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.