बुलढाणा : गेल्या ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी यंदा चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं. पण याचं भविष्यवाणीने काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची भीतीही वर्तवण्यात आलंय.
३५० वर्षांपूर्वी हवामान खाते नसल्यामुळे पाऊस-पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतक-यांना मार्गदर्शक ठरलेली घटमांडणीची सुरुवात केली. ती परंपरा सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या भेंडवळच्या वाघ कुटुंबीयांनी आधुनिक युगातही जपली आहे.
त्यानुसार आज भेंडवळ इथलं भाकीत आलंय. यावर्षी पाऊस चांगला असून पहिल्या महिन्यात कमी पाऊस पडेल दुसऱ्या, तिसऱ्या महिन्यात चांगला पाऊस पडणार असून चौथ्या महिन्यात कमी पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आलयं आहे.
रब्बी हंगाममधील पिकं चांगली असली तरी मोठ्याप्रमाणावर नासाडी होणार आहे. तर राजकीय स्थिती मध्ये देशाचा राजा कायम असून गादी म्हणजे पान यावर माती असल्याने राज्याला त्रास होणार आहे असंही भाकित वर्तवण्यात आलंय