लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण मृत्यूयंत्र आणि उतारा टाकून निच्छित करणाऱ्या भोंदूबाबाला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आलं आहे. संतोष पिंजन असं या भोंदूबाबाचे नाव असून तो लोणावळ्यातील भांगरवाडी येथील रहिवासी आहे.
सुरेखा जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलं होतं.
या घटनेने संपूर्ण लोणावळा शहरातील नागरिकांमध्ये संतप्ततेची भावना निर्माण झाली होती. तर अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्तेही हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलसांनी संतोष पिंजनला अटक केली.