नाशिक : आदिवासी विकास खात्यातला आणखी एक घोटाळा समोर आलाय. यावेळी तर चक्कविद्यार्थ्यांना थंडीसाठी देण्यात येणाऱ्या स्वेटरची किंमत अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्याचं पुढं आलंय. ३०० रुपयांचं स्वेटर थेट २१०० रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खात्यानं केली आहे.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
विशेष म्हणजे हिवाळा संपायला आला असला, तरी या स्वेटर्सची अजून खरेदीही झालेली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना थंडीत कुडकडावं लागलंय. या संदर्भात झी 24 तासच्या टीमनं आयुक्तांना गाठलं, मात्र त्यांनी मात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगलंय.
एवढंच नव्हे तर या कार्यालयातले अधिकारी याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलंत आहेत. याबाबतचा आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी थेट कार्यालताय जाऊन या प्रकरणाचा वेध घेतला. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
या संदर्भात आम्ही आदिवासी विकास आयुक्तांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाहीय.