नालासोपाऱ्यात गॅस एजन्सी मालकाची गोळ्या घालून हत्या

वसई तालुक्यातील नालासोपारा इथल्या त्रिलोकचंद गॅसएजन्सीचे मालक आणि बिल्डर राजेश सिंग यांची आज भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळउडाली आहे. 

Updated: Nov 5, 2014, 06:45 PM IST
नालासोपाऱ्यात गॅस एजन्सी मालकाची गोळ्या घालून हत्या title=

ठाणे : वसई तालुक्यातील नालासोपारा इथल्या त्रिलोकचंद गॅसएजन्सीचे मालक आणि बिल्डर राजेश सिंग यांची आज भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळउडाली आहे. 

व्यावसायिक कारणांतून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.साईनाथ नगर येथील आपल्या ऑफिसमध्ये सकाळी पूजापाठकरून राजेश सिंग बाहेर पडले. काही दुकानं सोडून ते पुढे आले,तेव्हाच पाठीमागून बाईकवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. 

या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राजेश सिंग यांच्या हत्येचं नेमकंकारण कळू शकलेलं नाही. परंतु, जागाविषयक वादावादीतूनचहा खून झाल्याचं बोललं जातंय.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, बाईकस्वारांना शोधण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.