भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा देण्यात आला आहे. सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलं आहे. सारा महाराष्ट्र जिंकूया अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय.

Updated: Jan 12, 2017, 03:14 PM IST
भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा

ठाणे : भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलो रे चा नारा देण्यात आला आहे. सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलं आहे. सारा महाराष्ट्र जिंकूया अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय.

केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी चांगली असल्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना चव्हाण यांनी हे विधान केलंय. जो एल्गार करतो तो पर्वतसुद्धा हलवू शकतो असंही चव्हाण म्हणालेत. याआधीही विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी युती नको अशी भूमिका मधु चव्हाण यांनी मांडली होती. तोच सूर भाजपच्या बैठकीत उमटला.. तत्पूर्वी या बैठकीच्या आधी ठाण्यात युतीला विरोध करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती. शतप्रतिशत भाजपचा नारा या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला होता. हाच सूर या बैठकीत उमटला.

About the Author