नागपूर : एकीकडे देशात अनेक राज्यात पारंपरिक खेळांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे नागपुरात रेड्यांच्या झुंजीचे प्रकार सातत्यानं होताना दिसतात.
डिसेंबर महिन्यात शहराच्या कालकुही गावात झालेली रेंड्यांची झुंज गाजली असतानाच 26 जानेवारीला लोणार, पेवठा, कन्हान भागात रेड्याच्या झुंजींच आयोजन करण्यात आलं होतं. या झुंजीवर हजारोंचा सट्टा लावल्याचीही सुत्रांची माहिती आहे. या झुंजीवर बंदी असतानाही ग्रामीण भागात सररासपणे या झुंजींच आयोजन केलं जातं. पण पोलिसांचेमात्र त्याकडे लक्ष नाही.