पुणे-नाशिक महामार्गावर बसने घेतला पेट

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण वाचले.

Updated: Feb 5, 2017, 11:20 AM IST
पुणे-नाशिक महामार्गावर बसने घेतला पेट title=
प्रातिनिधिक फोटो

जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण वाचले.

नारायणगावमधून इंदुरला लग्नासाठी ही बस निघाली होती. यावेळी आळेफाट्याजवळ येताच्या अचानक या बसने पेट घेतला. 

यावेळी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.