हिंगोली : 6 लाखाच्या 1 हजार आणि 500 च्या जुन्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित करण्यात आले आहे. औंढा नागनाथ शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हा प्रकार घडला.
आयडी प्रूफ आणि फॉर्म न भरुन घेता नोटा बदलून दिल्याने, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात कॅशिअर बाबूराव गुहाडे विरोधात, शाखा प्रबंधकाने तक्रार दाखल केली. अखेर पदाचा गैरवापर केल्याने कॅशीअर निलंबित करण्यात आले आहे.