मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या छगन भुजबळांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळांचा पाडवा हा जेलमध्येच जाणार आहे.
घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता छगन भुजबळांची कोठडी वाढवण्याची मागणी ईडीनं केली होती. पण भुजबळांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना जामिन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. पण कोर्टानं ही मागणी फेटाळली, आणि त्यांची कोठडी वाढवली.
या सुनावणीसाठी भुजबळांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आलं.