भुजबळांच्या अडचणी वाढल्या

सेंट्रल लायब्ररी घोटळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी माजी मंत्री छगन भुजबळ आणि अन्य 6 जणांवर आरोपपत्र दाखल केलं. 

Updated: Mar 28, 2016, 08:42 PM IST
भुजबळांच्या अडचणी वाढल्या title=

मुंबई: सेंट्रल लायब्ररी घोटळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी माजी मंत्री छगन भुजबळ आणि अन्य 6 जणांवर आरोपपत्र दाखल केलं. 

यामध्ये भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट रवींद्र सावंत यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय. हा घोटाळा नेमका कसा झाला, आणि कुणी कुणी संगनमतानं तो केला, याचे तपशीलवार पुरावे एसीबीनं या 17 हजार 400 पानांच्या आरोपपत्रात दिलेत. 

8 जून 2015 रोजी याप्रकरणी भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.