यवतमाळ : जिल्ह्यातल्या हजारो महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून चक्क फाटक्या साड्या पाठवल्यात.
दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय, याची जाणीव सरकारला व्हावी म्हणून आपल्या फाटक्या संसाराचं प्रतिक असलेल्या या साड्या सह्या करून पाठवण्यात आल्यात.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात दारूबंदीचं आंदोलन चांगलंच पेटलंय. चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्हादेखील पूर्णपणे दारूमुक्त करण्यात यावा अशी विविध संघटनांची मागणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.