मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले

 महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 13, 2017, 07:55 PM IST
मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले title=

मुंबई :  महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.

पुणे विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये योगायोगाने झाली भेट झाली. 

दोघेही एकमेकांकडे बघून फक्त हसले. दोघेही प्रचारासाठी पुण्यात होते. 

एकीकडे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असतांना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या या योगायोगानं झालेल्या भेटीमुळे उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या.