डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकर यांच्या मुलाचा आणि सुनेचाही मृत्यू झाल्याचं पुढं आलंय.
सुमित आणि स्नेहलता वाकटकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. काल सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून तो सुमित यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. तर
घटनास्थळापासून लांब २०० ते ३०० मीटर अंतरावर एका इमारतीच्या छतावर त्यांची सून स्नेहलता वाकटकर यांचा मृतदेह सापडलाय.
सुमीत आणि स्नेहलता यांचा नुकताच विवाह झाला होता. दोघेही केमिकल इंजीनिअर होते. तर अविनाश वाकटकर यांचा दुसरा मुलगा नंदन हा अजूनही बेपत्ता आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल अजूनही त्यांचा शोध घेत आहेत.