ठाणे : डोंबिवलीत वास्तव्याला असलेल्या ५० वर्षीय पोलीस हवालदार श्रीमंत डोंबाळे यांच्यावर काळानं घाला घातला आहे. मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या डोंबाळेंचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
श्रीमंत डोंबाळे हे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून, डोंबिवलीतल्या निळजे येथे राहतात. विशेष म्हणजे ज्या माणसाला डोंबाळे वाचवण्यासाठी गेले होते. तो माणूस जिवंत असून, त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबाळेंच्या मृत्यूमुळे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रिमंत डोंबाळे हे गेली चार वर्षे ठाणे जीआरपीमध्ये कर्यरत होते. आज सकाळी ११च्या सुमारास मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये एका जख्मी प्रवाश्याला त्यांनी इस्पितळात हलविण्यासाठी लोकलमध्ये चढवले परंतू कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा त्यांना धक्का लागून त्यांच्या डोक्यास जबर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या बँडकडून त्यांना सिव्हिल रुग्णालय येथेच मानवंदना देऊन त्यांचे पार्थिव घेऊन त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या गावी सोलापूर येथे प्रयाण केले.