रायगड : अलिबाग तालुक्यातील थळ समुद्रकिनारी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु झाली. 14 पैकी 3 जणांनी याठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असून त्यासंदर्भात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली एकूण 14 अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये मेसर्स देजावू फार्मस लिमिटेड तर्फे संचालक मोरेश्वर आजगावकर यांच्या मालमत्तेचा समावेश असून ही मालमत्ता सिनेअभिनेता शाहरूख खान यांची असल्याचे सांगितले जाते आहे.
या अतिक्रणणासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.