पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून न मिळाल्याने  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.

Updated: Nov 17, 2016, 11:16 PM IST
पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले title=

मालेगाव : ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून न मिळाल्याने  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.

जुन्या नोटा बदल्यासाठी मालेगावच्या मुशावरत  चौकात असलेल्या   जनता बँकेने नागरिकांना टोकन दिले होते.  मात्र तासांतास  रांगेत उभे राहून  पैसे न मिळाल्याने  नागरिक संतप्त झाले. त्यांनी बँकेला घेराव घालून  चक्क बँक  कर्मचाऱ्यांना कोंडूंन ठेवले.