धुळ्यात डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची आत्महत्या

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 14, 2017, 06:59 PM IST
धुळ्यात डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची आत्महत्या  title=

धुळे : धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

पोलीस स्टेशनच्या शौचालयात गोधडीच्या साहाय्यानं गळफास घेऊन प्रदीपनं आत्महत्या केलीय. या घटनेमुळं आता प्रभारी अधिकारी आणि ड्युटीवर असलेले कर्मचा-यांवर प्रकरण शेकलं जाण्याची शक्यता आहे. 

शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. मात्र या घटनेमुळं तणाव निर्माण झाला असून संशयीत आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केलंय. 

पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचं प्रकरण असल्यामुळं हा तपास सीआयडीकडे वर्ग केलं जाणार आहे. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिलीय. आरोपीच्या मृतदेहाचं इन-कॅमेरा शवविच्छेदन केलं जाणार आहे.