पंढरपूर : देहूतून तुकोबा आणि आळंदीहून निघालेल्या ज्ञानोबांची पालखी आणि त्याच बरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून घालेल्या वेगवेगळ्या पालख्या, दिंड्या सर्व विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरात दाखल झाल्यात.
तब्बल तीन आठवडे चाललेला हा वारीचा प्रवास आज आपल्या मुक्कामी पोहोचलाय.
आषाढीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करुन लाडक्या विठूरायाचं दर्शन घेऊन धन्य होण्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेत.
वारीचा अखेरचा टप्पा आला असला तरी पंढरपूरात दाखल झालेल्या पावसामुळे सर्वच वारक-यांचा आनंद द्विगुणित झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.