पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट

आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.

Updated: Nov 19, 2014, 09:56 AM IST
पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट title=

पंढरपूर: आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.

वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वस्छतेविरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल असून यासंदर्भात हायकोर्टानं दोन वकिलांची नियुक्ती करत अहवाल मागवला होता. या द्विसदस्यीय समितीनं हायकोर्टासमोर अहवाल मांडल्याचं वृत्त आहे. या अहवालाच्या आधारे हायकोर्टानं अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. 

'वारकरी स्वच्छतागृह असतानाही त्याचा वापर करत नाही आणि त्यामुळंच शहर आणि नदीकाठी घाणीचं साम्राज्य पसरतं. याबाबत विठ्ठल - रुक्मिणी मंदिर संस्थाना कोणतेही पाऊल उचलत नाही, असं हायकोर्टानं नमूद केलंय.

पुढील सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले जातील. या सुनावणीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनाचे प्रतिनिधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.