भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण

देहू रोड इथे भूत काढण्याच्या नावाखाली एका महिलेला मांत्रिकाने अमानुष मारहाण केलीय. देहू रोड पोलिसांनी जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार याविरोधात कारवाई केली आहे.

Updated: Mar 15, 2016, 01:26 PM IST
भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण title=

पिंपरी चिंचवड : देहू रोड इथे भूत काढण्याच्या नावाखाली एका महिलेला मांत्रिकाने अमानुष मारहाण केलीय. देहू रोड पोलिसांनी जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार याविरोधात कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वी महिलेचं आधीचं लग्न मोडलं होतं. तिचे दुस-या एका तरूणासोबत प्रेमसंबंध जुळले. पण या तरूणाचं लग्न दुस-या मुलीशी ठरलं होतं. त्यामुळे या महिलेचा लग्नात अडथळा होऊ नये यासाठी तिला तरूणाच्या कुटुंबियांनी भूतबाधेच्या नावाखाली मांत्रिकाकडून बेदम मारहाण केली.

पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिक भीमप्पा कुंचीकर, नंदा खुडे, मीना आणि संगीता या आरोपींना ताब्यात घेतलंय. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण अंधश्रद्धा निर्मुलन समितीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर अखेर जादू टोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.