मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या

करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

Updated: Aug 25, 2015, 08:25 PM IST
मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या title=

सोलापूर : करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

ती कथित क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल
विद्यार्थीनी आणि शिक्षक यांच्यातील अश्लिल संभाषणाची ही कथित क्लिप होती असं सांगण्यात येतं. या क्लिपमुळे आपल्या मुलीची बदनामी होतेय, म्हणून या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.

पण तुझ्या मुलीची बदनामी होईल, म्हणून तक्रार दाखल करू नको, असं काही तथाकथित पुढाऱ्यांनी त्यांना सांगितल्याने ते पोलिस स्टेशनमधून परतले.

बदनामीची भरपाई म्हणून नोटरी
या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून आपण तुम्हाला सहा लाख रूपये देतो, अशी नोटरीही करून घेतली. नोटरी म्हणजे स्टॅम्पपेपरवर लिहून घेतलंय की या प्रकरणी बदनामी झाल्याने सहा लाख रूपये भरपाई देण्यात आली, मात्र ही नोटरी संबंधिताला दारू पाजून दारूच्या नशेत केली असल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या जावयाने केला आहे.

बापाला पुन्हा टोमणे
तुझ्या मुलीच्या क्लिप प्रकरणाचा तू असा सौदा केलास, असे टोमणे या व्यक्तीला मारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या मुलीची बदनामी करण्यात आली यावरून या व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिक्षकाला १० दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली असून १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचं सांगण्यात येतंय.

पालकांनी शिक्षकांवर कसा विश्वास ठेवावा
या प्रकरणी न्यायालयाने आरोपी शिक्षकाचा जामीन नाकारला आहे, शिक्षकांनी कोणत्या विश्वासावर आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवावं? असा सवाल कोर्टाने केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.