पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Nov 25, 2016, 08:04 PM IST
पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर title=

पुणे : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नवीन 41 प्रभागांपैकी पंधरा प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यांनतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यात नागरिकांनी 133 सूचना आणि हरकती दिल्या. त्यानुसार पंधरा प्रभागाच्या रचनेत काही बदल करण्यात आले आहेत.

या प्रभागांमध्ये झाले बदल

नगर रोडवरील प्रभाग तीन, चार आणि पाच मध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रभाग तीन मधील काही भाग चार मध्ये आणि चार मधील काही भाग पाच मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याबरोबरच प्रभाग आठ आणि नऊमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. प्रभाग 13 मधील काही भाग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.