....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Dec 17, 2016, 03:52 PM IST
....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!  title=

नागपूर : काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

नागपूर रेल्वे मंडळानं स्थानकावर 'कॅशलेश' अर्थव्यवस्थेसाठी स्थानकावर तिकिट बुकिंग खिडकीवर एसबीआय बँकेच्या एकूण ३३ स्वाईप मशीन लावण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट खरेदीसाठी कॅशलेसचा पर्याय उपलब्ध झालाय, अशी माहिती रेलवे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांनी दिलीय. 

यापैंकी १० मशीन्स नागपूर रेलवे स्टेशनवर लावण्यात आल्या आहेत. इतर स्टेशनवर तसेच पार्सल कार्यालयात देखील दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात या स्वाईप मशीन लावण्यात येणार आहेत.