मुंबई : तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अन्न आणि औषधातील भेसळीबाबत टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. अन्न आणि औषधातील भेसळीबाबत काही तक्रार असल्यास 1800222364 आणि 1800222365 या २४ तास सुरु असणाऱ्या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.
कोकण विभागाचे अन्न व औषध सहआयुक्त एस एस देशमुख यांनी नागरिकांना या हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.