एफटीआयआयला धमकीचं पत्र

'एफटीआयआय' ला आलेल्या धमकी प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: May 8, 2016, 06:47 PM IST
एफटीआयआयला धमकीचं पत्र title=

पुणे: 'एफटीआयआय' ला आलेल्या धमकी प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे नवनियुक्त संचालक भुपेन कँथोला यांच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. 

संस्थेत कन्हैयाकुमारला प्रवेश दिला तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी या पत्रात देण्यात आलीय. शिवाय या पत्रामध्ये डिटोनेटर आणि स्फोट घडवण्यासाठीची पावडरही सापडलीय. याचा तपास बॉम्ब शोधक पथकानं केला.

पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले असून रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलंय. पत्राबाबत अजुन ठोस माहिती हाती लागली मिळाली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी सांगितले.