ठाणे : डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. हे दोघे मुंब्रा येथील आहेत.
यामुलीचे वय १४ वर्षे असून, इमारत पीओपीचे काम करणाऱ्या दोघांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अजामत अली ( २०) आणि कुरदीत आलम (२४) या दोघांनी एका इमारतीत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ते दोघे फरार झाले.
ज्या इमारतीत ही घटना घडली त्याच इमारतीत ही दोन मुले पीओपीचे काम करत होते. या घटनेची तक्रार दाखल होताच अवघ्या चार तासात मानपाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
हे दोघे उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी अगदी शिताफिने आरोपींना अटक केली. या कामी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी गौतम रणदिवे, नारायण बानकर, राजेंद्र दौंडकर, पीएसआय महेश काळे, पीएसआय नीलेश पाटील यांनी आरोपीला अवघ्या चार तासात अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.