नांदेड : अवकाशात उल्कापात सुरू असताना तुम्हाला हा क्षण उघड्या डोळ्यांनी पाहता आणि अनुभवता आला तर... होय, ही संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे.
मिथुन राशीतील उल्का वर्षाव पाहण्याची सुवर्णसंधी येत्या सोमवारी 14 डिसेंबरच्या रात्री मिळणार आहे. शहरातील प्रदूषणापासून दूर गेल्यास सहज उघड्या डोळ्यांनी ही भोगौलिक घटना पाहता येणं शक्य आहे. नांदेडमधील महात्मा मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिलीय.
11 डिसेंबर रोजी अमावास्या पूर्ण झाल्याने 14 सिसेंबर रोजी रात्रीच्या चंद्रप्रकाशाचा अडथळा हा उल्कापात पाहताना होणार नाही. त्यातच सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आकाश निष्प्रभ असते त्यामुळे, कोणत्याही अडथळ्याविना तुम्हाला हा उल्कावर्षाचा क्षण अनुभवता येणार आहे.
उल्का वर्षावाचे उगमस्थान मिथुन राशीतून असल्याने मिथुन राशीतील हा उल्का वर्षाव आहे. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय उल्का संघटनेतर्फे वितरीत केलेल्या माहितीनुसार 14 डिसेंबर रोजी जागतिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता, म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे अकरा (11.30) वाजता आपली पृथ्वी या लघुग्रहाच्या मार्गातून तसेच अतिशय बारीक कणांमधून मार्गक्रमण करणार आहे.
या कणांचे आपल्या पृथ्वीवरील वातावरणाशी घर्षण झाल्याने तेजस्वी प्रकाश होऊन ते कण जळून जातील व आपल्याला उल्का पडली असे चित्र दिसेल. हा उल्का वर्षाव रात्री साडेअकरा ते पहाटेपर्यंत पाहता येऊ शकतो. या वेळेस तासाला 120 ते 160 उल्का पडताना दिसतील असा अंदाज आहे. या उल्का इतर उल्का वर्षावांपेक्षा तेजस्वी व मध्यम गतीने म्हणजे 35 किलोमीटर प्रती सेकंद या वेगाने कोसळताना दिसतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.