जनरल मोटर्सची राज्यात १ अब्ज रुपयांची गुंतवणूक, १२ हजार रोजगार निर्मिती

 नेहमी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात, अशी ओरड होत असते. पण आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स गुजरातला नाही तर पुण्यातील तळेगावला आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. 

Updated: Jul 29, 2015, 06:33 PM IST
जनरल मोटर्सची राज्यात १ अब्ज रुपयांची गुंतवणूक, १२ हजार रोजगार निर्मिती  title=

मुंबई: नेहमी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात, अशी ओरड होत असते. पण आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स गुजरातला नाही तर पुण्यातील तळेगावला आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. 

राज्यातील प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढवण्याची घोषणा जनरल मोटर्स केली आहे. जनरल मोटर्सचे अध्यक्ष डॅन अमान यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भारतात १ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. 

जनरल मोटर्सचे सध्या भारतात गुजरातमधील हलोल आणि महाराष्ट्रातील तळेगाव इथं प्रकल्प आहेत. यातील हलोल प्रकल्पात दरवर्षी १ लाख २७ हजार गाड्या होतात. मात्र आता कंपनीनं हलोलमधील प्रकल्प बंद करुन तळेगावमधील प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचं अमान यांनी सांगितलं. 

तळेगाव प्रकल्पाची क्षमता आणखी वाढावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु असून या प्रकल्पात आगामी पाच वर्षात सुमारे सव्वा दोन लाख गाड्यांची निर्मिती होणं अपेक्षित आहे, असं ते म्हणाले. सांगितले. जनरल मोटर्स १ अब्ज रुपयांची गुंतवणूक करेल आणि यातून सुमारे १२ हजार रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.