शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट

कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत. 

Updated: Apr 16, 2015, 06:40 PM IST
शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट  title=

नाशिक: कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत. 

नदीची प्रदूषित स्थिती पाहता पात्रात अंघोळ करणाऱ्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसंच जुलै महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान नदी उतरणाऱ्या लाखो भाविकांचं आरोग्य धोक्यात येईल, असा अर्ज याचिकांकर्त्यांनी केलाय. यावर काय उपाय योजणार असा सवाल करत न्यायालयानं राज्य सरकारला 6 मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

जुलै महिन्यात नाशिक इथं कुंभमेळा होणार असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं या सोहळ्यावर अनंत अडचणी येऊ शकतात. अशीच परिस्तिथी राहिली तर नाशिकच्या नागरीकांचे आरोग्य ही धोक्यात येईल असं दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.