मुंबई : हुंड्यासाठी छळ आणि अश्लिलतेचा आरोप असलेली स्वयंघोषित देवी राधे माँ आणखी एका वादात अडकली.
औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमानात त्रिशूळ घेऊन राधे माँ दाखल झाली होती. यावर, या विमानात उपस्थित असणाऱ्या प्रवाशांना आपला आक्षेप नोंदवला.
सहसा, प्रवाशांना अशा गोष्टी आपल्यासोबत घेऊन विमानातून प्रवास करण्याची परवानगी नसते... कारण हा उड्डान विभागाचा नियम आहे आणि तो प्रत्येक प्रवाशावर लागू होतो. त्यामुळेच राधे माँसाठी हा नियम का मोडला गेला? असा सवाल प्रवाशांनी केला.
यावर, एअरपोर्ट विभागानं यावर वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. राधे माँच्या हातातील त्रिशूलला धार नव्हती. त्यामुळेच आम्ही त्याला परवानगी दिली, असं त्यांनी म्हटलं. परंतु, प्रवाशांचा राग क्षमला नाही... तर ते आणखीनच भडकले.
राधे माँच्या प्रवक्त्यानं मात्र हे सगळं खोटं असल्याचं म्हटलंय. केवळ राधे माँला बदनाम करण्यासाठी हे केलं जातंय, असं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.