मुंबई : सलमान खान बे अक्कल आहे, त्याला काही अक्कल नाही. वडील कुठे, तो कुठे असा खरपूस समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत घेतला.
राज ठाकरे यांनी सलमानवर तोफ डागताना म्हणाले, सलमाननचे वडील, सलीम साहेब आदर करणारा माणूस... हा रात्री दोन अडीच वाजता, कसा कुठे असतो आणि केले का ट्विट केले, त्याला काय केले हेच कळले नाही.
सलमानने अपघात केला, त्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात येणार होती, त्या वेळी सलमानच्या घरी, त्याला भेटायला गेलो नाही. काय कसा केला अपघात... असं विचारायला गेलो नाही... त्यांच्या वडिलांना भेटायला गेलो होतो. सलीम खान यांचे माझे जुने संबंध. त्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली होती.
याकूब मेमनच्या प्रकरणात सलमानने वक्तव्य दिलं, अशा बाबतीत मी मैत्री धरत नाही, असे खडेबोल राज ठाकरे यांनी सुनावले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.