डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

डहाणू-वाणगावदरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे ११ डब रुळावरुन घसरले.  रात्री उशीरा २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Updated: Jul 4, 2016, 08:34 AM IST
डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प title=

डहाणू : डहाणू-वाणगावदरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे ११ डब रुळावरुन घसरले.  रात्री उशीरा २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, या अपघाताचा लोकल वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत आहे.

या अपघातामुळे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे.तर मुंबईहून जाणाऱ्या १२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी मालगाडी, बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व गाड्या डहाणू स्थानकात थांबल्या आहेत.