हितेंद्र ठाकुरांच्या मुलाची २३ लाखांची 'डेव्हिडसन' बाईक, फोटोसाठी झुंबड

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वसई विरार ते पालघर परिसरात एकहाती वर्चस्व आहे. हितेंद्र ठाकूर यांचे धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांनी २३ लाखांची महागडी बाईक खरेदी केली आहे. 

Updated: Jan 12, 2016, 10:42 PM IST
हितेंद्र ठाकुरांच्या मुलाची २३ लाखांची 'डेव्हिडसन' बाईक, फोटोसाठी झुंबड title=

वसई : आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वसई विरार ते पालघर परिसरात एकहाती वर्चस्व आहे. हितेंद्र ठाकूर यांचे धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांनी २३ लाखांची महागडी बाईक खरेदी केली आहे. 

मात्र लोकप्रतिनिधींच्या मुलाने एका बाईकवर एवढे पैसे खर्च केल्याचा गवगवा होऊ नये, म्हणून या महागड्या गाडीचा मालक कागदोपत्री दुसराच असल्याचं समजतंय.

हितेंद्र ठाकूर यांचे धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांनी ही 23 लाखांची महागडी डेव्हिडसन बाईक खरेदी केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुबईवरून पांढऱ्या रंगाची आणि इंडियन असे नाव लिहलेली ही बाइक आणण्यात आली. वसई आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी ही बाईक आली तेव्हा बघ्यांनी गर्दी केली. 

परिसरातील लोकांची या बाईकचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली, यात आरटीओ कर्मचारीही फोटो काढायला मागे नव्हते. 

डेव्हिडसनच्या अत्याधुनिक बाईकने जगभरातील तरुणांना आकर्षित केले आहे. या बाइकची किंमत १ लाखांपासून सुरू होते, तर जास्तीत जास्त ५० लाखांच्या आसपास असते.