मुहूर्तावर लग्न न लावल्यास ५ हजार रूपये दंड

लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची मागील काही दिवसांपासून प्रथा पडली आहे. वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून उशीरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा एकमुखी ठराव जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला,

Updated: Jan 12, 2016, 08:27 PM IST
मुहूर्तावर लग्न न लावल्यास ५ हजार रूपये दंड title=

बुलडाणा : लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची मागील काही दिवसांपासून प्रथा पडली आहे. वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून उशीरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा एकमुखी ठराव जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला,

महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच तयार केली आहे.

प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण वापरल्यास २१०० रूपये दंड
आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी यांसारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रावळ्या, द्रोणसुद्धा न वापरण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला. त्यांचा वापर केल्यास संबंधितांना २१०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.