'होमिओपॅथीमुळेच बाळासाहेबांना व्यंगचित्र काढण्याचा आनंद मिळाला'

हात थरथरण्यामुळे व्यंगचित्र काढता येत नसल्याची खंत, होमेओपॅथीच्या उपचारामुळे दूर करण्यात यश आल्याचा दावा, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांनी केला आहे.

Updated: Jan 12, 2015, 09:11 AM IST
'होमिओपॅथीमुळेच बाळासाहेबांना व्यंगचित्र काढण्याचा आनंद मिळाला' title=

पुणे : हात थरथरण्यामुळे व्यंगचित्र काढता येत नसल्याची खंत, होमेओपॅथीच्या उपचारामुळे दूर करण्यात यश आल्याचा दावा, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांनी केला आहे.

सर्च होमिओपॅथिक कन्सल्टिंग ऍण्ड कॅन्सर केअर सेंटरच्या वतीने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, होय होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते,  या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते.

हा कार्यक्रम बाळासाहेबांना समर्पित करून संस्थेच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आलीय.

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील रूग्णांसाठी सामान्य रोगांपासून ते अगदी कर्करोगापर्यंतच्या आजारांनाही प्रतिबंध करण्यासाठी होमिओपॅथी प्रभावी माध्यम आहे, असे डॉ. इंदुलकर म्हणाल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.