नोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान

24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

Updated: Jan 3, 2017, 07:03 PM IST
नोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान title=

शिर्डी : 24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली. या काळात साईबाबांच्या झोळीत साईभक्तांनी 9 कोटी 84 लाख रुपयांचं विक्रमी दान दिलं. यात 74 लाखांच्या सोनं आणि चांदीचाही समावेश आहे, तर 25 देशांचं परकीय चनलही जमा झालंय. त्याच मुल्य होणं अजून बाकी आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानकडे आज सोळाशे कोटींच्या वर ठेवी तर 400 किलो सोनं आणि साडे चार हजार किलो चांदी आहेत. तसंच तब्बल आठ कोटी सत्तर लाखांचे हिरे जमा आहेत. शिर्डी संस्थान संचलित श्री साईबाबा रूग्णालयात आता दहा रुपयांत मोफत उपचार केले जाणार आहेत. तर भाविकांनी प्रसाद भोजनासाठी दिलेल्या देणगीतून वर्षभर मोफत भोजन दिलं जाणार आहे.