बुलडाणा : माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.
नराधम पतीनं पत्नी आणि मुलं झोपेत असताना त्यांच्यावर कु-हाडीने हल्ला करुन ठार करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत एक मुलगी ठार झाली असून अन्य तिघे गंभीर जखमी झालेत. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील ही धक्कादायक घटना घडली. हल्ला करणारा समाधान अंभोरे याचा पोलीस शोध घेत आहे.
घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्री २ वाजण्याच्या हा प्राण घातक हल्ला केला. यात त्याची १५ वर्षांची अश्विनी ही मुलगी मृत्यूमुखी पडली. तर पत्नीसह एक मुलगा आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली.