'सबको खत्म कर दूंगा,' हसनेन द्यायचा सतत धमकी

ठाण्याच्या कासारवडवली परिसरात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली. पेशाने सीए असलेल्या हसनेन वारेकरने घरातील १४ जणांची निघृणपणे हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केली.

Updated: Feb 29, 2016, 10:48 AM IST
'सबको खत्म कर दूंगा,' हसनेन द्यायचा सतत धमकी title=

ठाणे : ठाण्याच्या कासारवडवली परिसरात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली. पेशाने सीए असलेल्या हसनेन वारेकरने घरातील १४ जणांची निघृणपणे हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केली.

या दुर्देवी घटनेतून हसनेनची एकमेव बहिण सुबिया बचावली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुबियाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हसनेन घरात असायचा तेव्हा सतत मै सबको खत्म कर दूंगा अशी धमकी द्यायचा. मात्र त्याचे बोलणे तो प्रत्यक्षात उतरवेल असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते, असे सुबिया म्हणाली. 

हसनेने हे कृत्य का केले याचा पोलीस तपास करत आहे. घटनास्थळावरुन हसनेनचा मोबाईल तसेच लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.