नाशिक : देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.
गेल्या काही दिवसांपासून हा जवान बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली होती. मॅथ्युज मुळचा केरळचा आहे. सैन्यातल्या अधिकाऱ्यांकडून जवानांची कशी पिळवणूक होते, याबाबतचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियात व्हायरल केला होता, त्यानंतर तो चर्चेत आला होता.
मॅथ्युजच्या मृतदेहाची अवस्था पाहता दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होतोय. दरम्यान, त्याच्याजवळ एक मल्याळी भाषेत लिहिलेली चिट्ठी आढळल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आलीय. हत्या की आत्महत्या याबाबत तपास सुरु आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते या घटनेची दखल घेतात का, याकडं सर्वांचं लक्ष आहे.