रखडलेल्या, वादग्रस्त जलतरण तलावाचे अतिक्रमण काढले

शहरातील जयहिंद जलतरण तलावाचे गेल्या कित्तेक वर्षांपासून विवादास्पद अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आले. आमदार अनिल गोटे यांनी स्वतः या जलतरण तलावाचे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. 

Updated: Nov 30, 2016, 11:22 PM IST
रखडलेल्या, वादग्रस्त जलतरण तलावाचे अतिक्रमण काढले title=

धुळे : शहरातील जयहिंद जलतरण तलावाचे गेल्या कित्तेक वर्षांपासून विवादास्पद अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आले. आमदार अनिल गोटे यांनी स्वतः या जलतरण तलावाचे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. 

सर्व प्रशासकीय यंत्रणा बोलावून आमदार गोटे यांनी हे अतिक्रमण एक झटक्यात काढले असून अतिक्रमण निर्मलनापर्यंत आमदार गोटे स्वतः त्याठिकाणी तळ ठोकून होते. 

शहरातून वाहणाऱ्या पाझर नदी किनार्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी रस्ते प्रास्तवित करण्यात आले असून, या रस्त्यांच्या कामात हे जलतरण तलावाचे अतिक्रमण अडसर ठरत होते. 

गेल्या एक दशकापासून हे अतिक्रमण केव्हा काढले जाणार याकडे धुळेकरांचे लक्ष लागून होते. अखेर जलतरण तलावाचे अतिक्रमण काढले गेल्याने शहरातील इतर अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.