आणखी एका काटई टोल नाक्याची भर

कल्याण डोंबिवलीकरांसाठी समस्या कमी होत्या की काय? त्यात काटईचा टोल नाक्याने आणखी भर घालण्यात आली आहे. 

Updated: Oct 11, 2014, 12:44 PM IST
आणखी एका काटई टोल नाक्याची भर title=

ठाणे : कल्याण डोंबिवलीकरांसाठी समस्या कमी होत्या की काय? त्यात काटईचा टोल नाक्याने आणखी भर घालण्यात आली आहे. 

हा टोल नाका काटई गावातून हटवावा एवढचं नाही तर टोल नाका बंद करावा, अशी मागणी स्थानिकांनी वारंवार केली. राजकीय आंदोलन झाली पण टोल नाका आहे तिथेच आहे. 

काटई टोल नाका. मुंबई इंट्री पाँईट ही कंपणी हा टोल नाका चालवते. चांगले रस्ते तर सोडा पण साधी चांगली वागणूकही या टोल नाक्यावर प्रवाशांना दिली जात नाही. किती टोल वसूल झाला आणि कधीपर्यंत टोल वसूल केला जाणार आहे, अशी कोणतीही माहिती या टोल नाक्यावर लावण्यात आली नाही.
 
हा टोल नाका कल्याण डोंबिवलीकरांसाठी तापदायक ठरत आहे. चांगले रस्ते नसल्यामुळे आधीच या रस्त्यांवर खूप ट्रफिक होतं. त्यातच टोल नाक्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात. धक्कादायक बाब म्हणजे हा टोल नाका काटई उड्डाणपुलाला लागून असल्याने, संध्याकाळच्या वेळी उड्डाणपुलावर तासन तास वाहनांच्या रांगा असतात. त्यात अवजड वाहनेही असतात. परिणामी या उड्डाणपुलाचं आयुष्य कमी होत चालल आहे. हा टोल नाका बंद व्हावा या करता मनसेने आंदोलन करत टोल नाक्यावर तोडफोडही केली होती.
 
नवीन सरकार स्थापन झाल्यावर तरी कल्याण-डोंबिवलीकरांना या टोल नाक्यापासून मुक्तता मिळणार का ? असा सवाल वाहनधारक विचारतायेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.