महिन्याभरापासून तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज बंद...

कर्जतच्या तासगावकर इंजिनीअरींग कॉलेजचा प्रश्न चिघळला. महिना होत आला तरी बंद केलेलं कॉलेज कुलगुरुंच्या आदेशानंतरही सुरु झालेलं नाही. त्यामुळे इंजिनीअरींगच्या हजारो विद्यार्थ्यांचॆ भविष्य टांगणीला लागलंय.

Updated: Feb 3, 2015, 05:58 PM IST
महिन्याभरापासून तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज बंद... title=

मुंबई : कर्जतच्या तासगावकर इंजिनीअरींग कॉलेजचा प्रश्न चिघळला. महिना होत आला तरी बंद केलेलं कॉलेज कुलगुरुंच्या आदेशानंतरही सुरु झालेलं नाही. त्यामुळे इंजिनीअरींगच्या हजारो विद्यार्थ्यांचॆ भविष्य टांगणीला लागलंय.

मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेर जमलेले शेकडो विद्यार्थी इंजिनीअरींग कॉलेजचे विद्यार्थी आहेत.  कर्जत येथिल तासगावकर कॉलेजला 8 जानेवारीपासून टाळं लागलंय. कारण तासगावकर कॉलेज व्यवस्थापनाने प्रोफेसर्स आणि शिसकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिन्यापासून थकवले. त्यामुळे प्रोफेसर्सनी कॉलेजला येणं बंद केलंय. व्यवस्थापन आणि प्रोफेसर्सच्या वादाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. कुलगुरु राजन वेळूकर यांनी 31 जानेवारीपर्यंत कॉलेज सुरु करण्याचे आदेश दिले होते पण कॉलेस सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेट बाहेरच धरणो आंदोलन सुरु केलं.
 
गेल्या 24 दिवसांपासून प्रोफेसर्सरांचं काम बंद आंदोलन केल्यानं कॉलेज बंदच आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचं शैसणिक नुकसान होतंय. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाहीत. इंटरनल्सचे मार्क्स रखडले... सेमिस्टर्सचे निकालही रखडलेले आहेत. 
 
निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळालेल्या नंदकुमार तासगावकर यांचं हे कॉलेज आहे. त्यामुळे ट्रस्टला राजकीय अभय तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
 
यावर, 'झी मीडिया'नं काही सवाल उपस्थित केलेत...
* सहा महिने झाले तरी ट्रस्ट पगार का देऊ शकत नाही?
* विद्यार्थ्यांच्या फीचे कोट्यवधी रुपये कुठे गेले?
* विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?
* एक महिना होत आला तरी ट्रस्टींवर कारवाई का नाही?
* कॉलेजच्या ट्रस्टला राजकीय अभय तर नाही ना? 
 
इंजिनीअरींग कॉलेजमधला हा कारभार शिक्षणाच्या बाजारीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न शिक्षणमंञी कधी सोडवणार? आणि कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळावर कारवाई होणार का? हाच सवाल आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.