जामखेडात तुरुंगाची कौल काढून ४ कैदी फरार

अहमदनगरच्या जामखेड इथं तुरुंगातून ४ कैदी फरार झालेत. तुरुंगाचे कौले तोडून या कैद्यांनी पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. 

Updated: Jun 13, 2015, 01:59 PM IST

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड इथं तुरुंगातून ४ कैदी फरार झालेत. तुरुंगाचे कौले तोडून या कैद्यांनी पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री चार अट्टल गुन्हेगार फरार झाल्यानं तुरुंग प्रशासन हादरलं आहे. जेलच्या छताची कौलं तोडून या चौघांनी पोबारा केल्याचं समोर आलं आहे. जबरी चोरी आणि दरोड्याचा आरोप या कैद्यांवर आहे. जामखेड पोलीसांनी दोनच दिवसांपूर्वी ज्या बारा गंभीर गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला होता. त्याच गुन्ह्यांमध्ये हे सर्व आरोपी अटकेत होते.

जामखेडमध्ये सुरु असलेला पाऊस आणि गायब झालेली वीज याच संधीचा फायदा घेत या अरोपींनी पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुखांची जामखेडला भेट दिलीय. पहाटेपासून अरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.