लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, १० ठार, २ जखमी

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झालाय. ट्रक आणि ट्रॅक्स क्रूझरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झालेत. तर दोन जण गंभीर आहेत. चाकूरजवळ ही घटना घडली आहे.

Updated: Jul 24, 2015, 01:16 PM IST
लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, १० ठार, २ जखमी title=

लातूर: लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झालाय. ट्रक आणि ट्रॅक्स क्रूझरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झालेत. तर दोन जण गंभीर आहेत. चाकूरजवळ ही घटना घडली आहे.

चाकूर जवळील ब्रम्हवाडी पाटीजवळ ट्रक आणि क्रूजरची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात ट्रकच्या धडकेत क्रूजरचा अक्षरशः चूरा झाला. अपघात इतका भीषण होता की यावेळी क्रूजर गाडीतून प्रवास  करणाऱ्या दहाही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर याचसोबत ४ ते ५ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
 
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.