जळगावमध्ये दारुची दुकाने वाचविण्याचा घाट, महामार्ग पालिकेकडे देण्याचा निर्णय मागे

सार्वजनिक बांधकाम विभागानं शहराच्या हद्दीतील महामार्ग पालिकेकडे देण्याचा निर्णय मागे घेतलाय. लिकर माफियानी स्थानिक आमदाराला हाताशी धरून महापालिका हद्दीत समावेश करुन ४५ बियर बार, तसेच दारु विक्रीची दुकाने वाचविण्याचा घाट घातला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

Updated: May 5, 2017, 10:31 AM IST
जळगावमध्ये दारुची दुकाने वाचविण्याचा घाट, महामार्ग पालिकेकडे देण्याचा निर्णय मागे title=

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागानं शहराच्या हद्दीतील महामार्ग पालिकेकडे देण्याचा निर्णय मागे घेतलाय. लिकर माफियानी स्थानिक आमदाराला हाताशी धरून महापालिका हद्दीत समावेश करुन ४५ बियर बार, तसेच दारु विक्रीची दुकाने वाचविण्याचा घाट घातला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

शासनाच्या या निर्णयानंतर हे ४५ बियर बार आता बंद होणार आहेत. दुपारनंतर लेखी आदेश आल्यानंतर आज सर्व 45 दुकाने कायम स्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. दुकान मालक देखील कोर्टात गेले आहेत. पण शासनाच्या आदेशानंतर त्यांच्या या निर्णयाला काहीच महत्व राहणार नाही.