महाड सावित्री दुर्घटनेतील जयगड- मुंबई एसटीचा सांगडा सापडला

रायगडमधील महाड- पोलादपूर सावित्री पूल दुर्घटनेतील दुसरी बस बाहेर काढण्यात यश आले आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर जयगड - रत्नागिरी- मुंबई बस सापडली.

Updated: Aug 13, 2016, 11:34 PM IST
महाड सावित्री दुर्घटनेतील जयगड- मुंबई एसटीचा सांगडा सापडला title=

मुंबई : रायगडमधील महाड- पोलादपूर सावित्री पूल दुर्घटनेतील दुसरी बस बाहेर काढण्यात यश आले आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर जयगड - रत्नागिरी- मुंबई बस सापडली.

महाड पूल दुर्घटनेतील जयगड-मुंबई या एसटीचा सांगाडा बाहेर काढण्यात तब्बल ११ दिवसांनंतर यश मिळाले. महाड दुर्घटनेत दोन एसटी बेपत्ता होत्या. काल राजापूर - बोरीवली एसटी बाहेर काढण्यात आली. तर आज दुसरी एसटी बाहेर काढली गेली. एसटीतील ४२ लोक बेपत्ता झाले होते. त्यापैकी २२ जणांचे मृतदेह हाती सापडलेत. मात्र, खासगी वाहने अद्याप बेपत्ता आहेत. तवेरा गाडीतील दोघांचे मृतदेह हाती सापडलेत. अद्यापही तवेरा कार सापडलेली नाही.

महाड दुर्घटनेतली दुसरी बस घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर सापडली. नौदलाने अथक प्रयत्नांनंतर या बसचे अवशेष बाहेर काढले जातायेत. पाच मीटर खोलवर ही बस रुतून बसली होती. पहिली बस दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर काल मिळाली होती. या अपघातील आतापर्यंत २६ प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र अजून १५ जण बेपत्ताच आहेत.