मुंबई : राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे.
नवीन धोरणानुसार राज्यात एका व्यक्तीची दोन पेक्षा जास्त स्मारकं उभारता येणार नाहीत. विशेष म्हणजे ही दोन स्मारकं, दोन वेगळ्या महसुली प्रशासकीय विभागात उभारणं बंधनकारक असणार आहे.
मात्र एखाद्या व्यक्तीच्या दोन स्मारकांखेरीज जास्त स्मारकं उभारायची असतील, तर त्यासाठी संबंधीत संस्थेला त्यासाठी आवश्यक जमीन आणि खर्च करावा लागणार आहे.
तसंच नुसती पुतळ्याच्या स्वरुपात स्मारकं उभारण्याऐवजी, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, संशोधन संस्था, ग्रंथालय अशा स्वरुपात स्मारकं उभारली जावीत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.