पुणे : शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, व्यसनी शिक्षकांच्यावर बडतर्फीसारखी कारवाई होऊ शकते असा कडक इशारा दिला आहे.
शिक्षण संचालनालयाने व्यसनी शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार नसल्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, एकदा इशारा देऊनही सुधारणा न झाल्यास बडतर्फीचा कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दारू, तंबाखू आणि विडीसारख्या व्यसनांना जवळ करणाऱ्या शिक्षकांचे अनुकरण विद्यार्थी करू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थीही व्यसनी बनू शकतात, त्यामुळे शिक्षकांनीच आदर्श वागणूक आचरणात आणावी असा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्रालय करत आहे.