पुणे : काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आणि माजी महापौर चंद्रकांत छाजेड यांचं आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. दरम्यान, औंध रस्ता ते भाऊ पाटील रस्ता बोपोडी येथील निवासस्थानापासून दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. बोपोडी येथे अंत्यविधी करण्यात आले.
1978 साली बोपोडीच्या पोटनिवडणुकीत ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यातनंतर 2002 पर्यंत ते पुणे महापालिेकेचे सदस्य होते. 1987-88 मध्ये त्यांना शहराचं महापौर होण्याची संधी मिळाली.
त्यानंतर 1999 ते 2009 य़ा काळात त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिले. सुशीलकुमार शिंदें मुख्यमंत्री असताना पर्यटन राज्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. छाजेड यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली आणि नातवंड असा परिवार आहे.